गझलकार दिनेश जी भोसले सुरेखा कटारिया चा नमस्कार गुढीपाडव्याच्या

हार्दिक हार्दिक अभिनंदन

गझलकार दिनेश जी भोसले सुरेखा कटारिया चा नमस्कार गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा..! 
काल रात्री अखिल भारतीय कटारिया गोत्र महिला अधिवेशना साकारून हैदराबाद हून आले त्या अखिल भारतीय कटारिया फाउंडेशनच्या राष्ट्रीय महामंत्री पदामुळे मला जावे लागले.
*दिनेशजी आपण मला दिलेला गजलपुष्प जागतिक महिला दिनानिमित्त जो विशेष सन्मान करून सन्मानित केले.त्याबद्दल मी आपली मनःपूर्वक अभिनंदन करते.आभार व्यक्त करते.*
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लिहिलेला *सूर्य आहे पेरला हा गजल संग्रह,गझल पुष्प अतिशय सुंदर बौद्धिकतेची श्रीमंती दर्शविणारा आणि तळागाळातील अनेक समस्यांचा उहापोह घेणारा हा गझल संग्रह मनाला भावला.*
खरोखरच
 *दहा दिशांनी वादळ येते धुडकावत ज्या वाटा*
*त्या वाटांवर जगण्यासाठी बंड बळावत आहे*.
गझला वाचल्या आणि जीवनाकडे डोकावू लागले. असं वाटलं याच्यात अनेक व्यक्तिमत्त्वांच्या मनाचा वेध घेतला आहे. मनकवडे होऊन प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये समर्पित होऊन त्याची सूचकता आपल्या प्रतिभेद्वारे आपल्यातील प्रज्ञेचा सूर्य चमकत आहे. जे पेराल तेच उगवतं. आयुष्यातील प्रत्येक संघर्षाच्या काळामध्ये आपण कवितेतून, गजलेतून निर्मळ असा स्वर जपून ठेवला आहे. आणि त्याचे गाणे होऊन जात आहे. खरोखरच यातील गजलींचा अभ्यास केला असता, या *जगण्यावर शतदा प्रेम करावे* असे हे जिंदादिल असणारे *शायर आमचे स्नेही ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय दिनेशजी भोसले आपले खूप खूप अभिनंदन करताना मन भरून येते*.
असे प्रतिभावंत लोक समाजात आहेत, म्हणूनच समाजाच्या दिशाची वाटचाल विकासाच्या आत्म अवलोकनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 
सर,आपण दिलेला गझल पुष्प हा पुरस्कार घेत असताना मला मनस्वी आनंद होत आहे. या सन्मानचिन्ह वरील दोन ओळी अतिशय मनाला भावल्या.
*माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे*
*वाळल्या वेलीस माझ्या अमृताची फुल यावे*
 क्या बात है! 
पुनश्च आपल्या सर्व ट्रस्टी गणांचे व आपले मनःपूर्वक ऋणनिर्देश व्यक्त करते. 
आपली भगिनी प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे जय जिनेन्द्र हॅपी

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण