विषय :- रात्र थोडी सोंगे फार अष्टाक्षरी काव्यप्रकारअर्थ :- कामे भरपूर पण वेळ थोडा

काव्यबहर साहित्य मंच, भंडारा दिनांक :- ०५.०२.२०२६ गुरुवार
उपक्रम क्रमांक :- ११६२-म्हणी विशेष
विषय :- रात्र थोडी सोंगे फार अष्टाक्षरी काव्यप्रकार
अर्थ :- कामे भरपूर पण वेळ थोडा
रात्र थोडी सोंगे फार
जीवनाचा हाच सार. 
दैव देते कर्म नेते
सोनं संधीच करते  .१

देव भुकेला भक्तीचा
सार तो इच्छाशक्तीचा
देव तारी कोण मारी
पुरुषार्थ असे भारी.२

ध्वनी तसा प्रतिध्वनी
करा सत्कर्म जीवनी
नळी  फुंकिली सोनारे
नसे निष्फळ ते सारे.३

नसे निर्मळ जीवन
काय करेल साबण
नाकापेक्षा मोती जड
कामा करताना नड.४

रात्र थोडी  सोंग फार
होई चोरावर मोर
तळे राखी पाणी चाखी
सृष्टी आड दृष्टी राखी. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता