आजचे कवी. *कवयित्री शांता शेळके*शब्द ओळ. *ही वाट दूर जाते*

सोमवार दिनांक २-२-२०२६ चा दैनिक उपक्रम क्रमांक ११५९🌹*
उपक्रम. *शब्द ओळ कवीची*
 भावना आपल्या मनीची 

आजचे कवी. *कवयित्री शांता शेळके*

शब्द ओळ. *ही वाट दूर जाते*

बोल तू  जरा काहीतरी
वाट ही  दूर जाते खरी.
शब्द रे गुलकंदापरी
तीर मारती मनावरी.१

डोळे तुझे जादू भरले
 मन आनंदे शहारले. 
तुझ्या नजरेची दिवाणी
तुझी मी सुरेख शहाणी.२

सख्या तण गुलाब झाले
मन माझे गुलकंदले
फुलं उधळे ओंजळभर
हर्ष भरे मन  विभोर. ३

नाही राहिले मी हो माझी
सदा झाले दिवानी तुझी
कळीदार गजरा माळे
कुंतलात प्रेमाचे जाळे. ४

 झुले झुमके ती टिकली 
लालबुंद डोई ठसली
गोड हसू तुझ्याच साठी
छंद  तुला भेटण्यासाठी. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन