स्वामी विवेकानंद*

*स्वामी विवेकानंद*

    युवकांचे केले हो नेतृत्व
परदेशी गाजविले वक्तृत्व
   महती सांगे मातेचे सुपुत्र
जागवे सर्वांमध्ये मातृत्व. १

  असे बंगाल देशाचे विवेकानंद
रामकृष्ण परमहंसचे गुरुभक्त
  अभ्यासू प्रबोधनात्मक आनंद
देणारे नरेंद्र देशाचे परमभक्त. २
   
     देश विदेशात सांगे तत्त्वज्ञान
होई प्रभावित धर्म परिषद
   शिकागोत भगवा संन्यासी वेश
भारताचे भूषण विवेकानंद.३

   उठा जागे व्हा ध्येय समोर ठेवा
 सदा,थांबू नका घोषवाक्य
    स्वतःमधील आत्मविश्वास 
आत्मशक्ती याने सारे शक्य. ४

    अज्ञान अंधश्रद्धेला फाटा देती
अलौकिक बुद्धिमत्तेचे ते धनी
   जीवनात शिक्षण हे महत्त्वाचे
युवकांना सल्ला देई  बाहुगुणी. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता