शब्दकवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शब्द ओळ,विषय-व्यायाम अंगी वाढीस स्फूर्ती.

🙏🏻 काव्य बहर साहित्य मंच,
भंडारा,आयोजित उपक्रम,
क्रमांक-११४६
सोमवार,
दिनांक-१९/१/२६

शब्दकवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शब्द ओळ,

विषय-व्यायाम अंगी वाढीस स्फूर्ती. 
शीर्षक-महत्व व्यायामाचे 

 व्यायाम अंगी वाढवे स्फूर्ती
रोज करूया आपण प्रभाती. १

फिरणे योगासने प्राणायाम
निजा आरोग्याचे असे धाम. २

सदा हसमुख राहण्यासाठी
व्यायाम रोग पळवण्यासाठी. ३

लवकर निजा लवकर उठा
शरीरात ऊर्जेचा होतो साठा. ४

 जन्मावर शतदा प्रेम करण्या
व्यायाम आरोग्य संभाळण्या. ५

शुभंकरोती म्हणा आरोग्यची
धनसंपदा,स्फूर्ती व्यायामाची. ६

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता