कविता - शब्दं

काव्य बहर उपक्रम
रविवारचा उपक्रम आवडती कविता

कविता - शब्दं

मुक्याच शब्दांना
भावरूप देताना
तुझी साथ हवी
 मज जगताना. १

कधी हसवती
हस-या क्षणानं
कधी रडवती
हळव्या मनानं.२

रूप भावनांना
शब्द साधनांना
कवितेचे पंख 
मिळता शब्दांना. ३

मम् विचाराला
मम् प्रतिभेला
धुमारे फुटती
भाव भावनेला. ४

मनाचे सोहळे 
पुरवी कविता
मौनातही शब्द
धावते सरिता. ५

तिन्हीसांजेत ही
उधळती रंग
मिळे शब्दासवे
गंध स्मृतीं संग . ६

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!