विषय:-- *दशदिशा उजळवतो दिनकर

काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शनिवार दिनांक १७-१-२०२६ चा दैनिक उपक्रम क्रमांक ११४४ 
  
   उपक्रम. :-- निसर्ग काव्य

विषय:-- *दशदिशा उजळवतो दिनकर

दशदिशा उजळवतो दिनकर
मना बनवीतो सदा कणखर. १

ड जीवनसत्व पुरवतो सर्वत्र
जणू  आरोग्याचा तोच मित्र. २

दिनकर ऊर्जाचा मोठा स्त्रोत
जीवसृष्टी वाढवतो ओतप्रोत. ३

धरतीवर येई कोवळी किरणे
मनास लोभवते  दृश्य देखणे. ४

सरूनी निशा उभरुनी येई उषा
वसुंधरा वाटे भास्कराची स्नुषा.५

सोहळा पृथ्वीचा हर्षभरेप्रेमाचा  
 प्रकाश सर्वत्र पसरे चैतन्याचा. ६

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!