विषय -- चित्र काव्य शीर्षक - स्नेहाचा उमाळाकाव्य प्रकार -छोटा अभंग
काव्य बहर समूह आयोजित दिनांक १४जानेवारी
विषय -- चित्र काव्य
शीर्षक - स्नेहाचा उमाळा
काव्य प्रकार -छोटा अभंग
सण संक्रांतीचा आला
आला उमाळा स्नेहाला. १
वाण वाटूया स्नेहाचे
जगू जीवन सुखाचे. २
दोर हाती जीवनाची
मजा घेऊ पतंगाची. २
तिळा गुळाचा गोडवा
तीडा मनीचा सोडवा. ३
दूर कटूता करत
गोडी नांदो संसारात. ४
पौष सूर्य उपासक
प्रकाशाचा प्रसारक. ५
बोर शेंगा गहू वाण
सवाष्णीचा वाढे मान. ६
ईश्वराचे करू पूजन
सदा नमू गुरुजन. ७
तिळगुळ देऊ घेऊ
एकमेका प्रेम देऊ. ८
गोड सु-रेखाचा भाव
आनंदाचा जणू गाव. ९
प्रा.सुरेखा कटारिया- चिंचवड पुणे✒️