विषय:-- *व्यसन*
काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित मंगळवार दिनांक १३-१-२०२६ चा दैनिक
उपक्रम सामाजिक काव्य
विषय:-- *व्यसन*
व्यसन हा जीवन मूल्यातील
सुमंगल तत्त्वाची पायमल्ली
करे,क्षणिक चंगळवादासाठी
युवा स्वतःस समजतो वल्ली. १
जो तो दिसे आपल्यामध्ये गुंग
सोशल मीडियावर दिसतो दंग
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार दृक.
श्राव्य माध्यम दृश्याचे हेच रंग.२
वक्ता लेखक शिक्षक पत्रकार
मानतो सामाजिक पालकत्व
वृतस्थ भाव ठेवणारे नंदादीप
पण तेच गाजवतात मालकत्व.३
नव्यापिढीची भाषा संगणकाच्या
काचपडद्यावर फिरकत असते
माऊसच्या तालावर कीबोर्डच्या
लेखणीवर ती सदाचॅटिंग करते.४
येणारे नवे सांस्कृतिक प्रवाह
घाईन थोपवता येणार नाहीत
लिखित भाषेचं सत्वटिकवण्या
समाज प्रबोधन नाहीच होत .५
व्यसन हव छंदांचं,सुसंवादाचं
राष्ट्रभक्ती लेखणीनं सत्कर्मानं
चला माणूस बांधूया अंतरीच्या
उमाळ्यानं संवाद जिव्हाळ्यांनं.६
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️