विषय : राजमाता जिजाऊ*दिनांक :-१२/०१/२०२६*राजमाता जिजाऊ*

     
*विषय : राजमाता जिजाऊ

*दिनांक :-१२/०१/२०२६

*राजमाता जिजाऊ*

राजमाता त्या जिजाऊ सदा
     करतात संस्काराची रुजवण
शिवबांना स्वातंत्र्याचा वसा
  त्या मातेस त्रिवार वंदन नमन१

      अंधश्रद्धेला घालून आळा
शिवबांसाठी ,देशाप्रेमासाठी
    सती चालीला देऊन फाटा
सज्ज जिजाऊ समर्पणासाठी 

    माता  जिजाऊंनी स्वराज्याची
मशाल तेवती ठेवली मनात
     स्थापन केले हिंदू स्वराज्य
राष्ट्राचे बीज रोवले माणसात. ३

    जिजाऊ होत्या स्वाभिमानी
राष्ट्रप्रेमी करारी बाणेदार
      देश प्रेमाने भारावलेल्या त्या
सतेज ठेवी तलवारीची धार. ४

      स्वराज्याचा सार्थ अभिमान
शिवछत्रपती असे महान
     आया बायांच्या संरक्षणाचे
शिवबा नी सदा ठेवले भान. ५

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!