शीर्षक:- मार्ग सदाचाराचा*

*आजचा उपक्रम*
*म्हणीवरून काव्य*
*आचार भ्रष्टी सदा कष्टी*

*शीर्षक:- मार्ग सदाचाराचा*

आचार भ्रष्टि सदा हो कष्टी
स्व स्वार्थास देई सदा पृष्टी. १

करे फसवा फसवी चे धंदे
खोटे टिंगल टवाळकी वंदे. २

जसे पेराल तसेच उगवते
कुकर्म पापाचे घडे भरते. ३

यांना लुटा त्यांनाच वाटा
तुपानं स्वची पोळी लाटा. ४

स्वकृती शिकवते मुलांला
पालकांनो आवरा मनाला. ५

दुसऱ्याला खांदलेला खड्डा
शिकवतो स्वतःलाच धडा. ६

मार्ग धरूया हो सत्संगाचा
सदाचाराच्याच संस्काराचा. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे३३✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता