शब्द ओळ:-- *आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या*

काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित सोमवार दिनांक ५-१-२०२६ चा दैनिक उपक्रम क्रमांक ११३२ उपक्रम
  विषय:-  *शब्द ओळ कवीची*
आजचे कवी  *सुधीर मोघे*

शब्द ओळ:-- *आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या*

ज्ञानाचे माहेरघर ते पुणे
   नाही हो ज्ञानगंगेत उणे. १

आशा उद्याच्या गं डोळ्यात
       फुलवते स्वप्न मळ्यात. २

अंधारात दिव्य प्रकाश
   भव्य स्वप्नपूर्तीस आकाश.३

हवी जिद्द आत्मविश्वास
     समस्यांचा होईल -हास.४

तिमिराकडून तेजाकडे
   नाते अपुले यशाशी जडे. ५

नवी दिशा नवी ती आशा
    प्रगतीच्या  ठेवू आकांक्षा. ६

नको स्पर्धा दुसऱ्याबरोबर
    सदा असावी स्वतःबरोबर. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे३३✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता