विषय :- गंध तुझ्या प्रीतीचा *उपक्रम क्र. ११२९*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शुक्रवारचा उपक्रम
      *प्रेम काव्य*
     
*विषय :- गंध तुझ्या प्रीतीचा
  *उपक्रम क्र. ११२९*
*शुक्रवार दिनांक :-०२/०१/२०२६*

गंध तुझ्या प्रीतीचा
विरहात  जाणवतो
आठवण येता तुझी
जीव माझा मोहरतो. १

प्रीत आपली वेगळी
मोर फुलवी पिसारा
मेघ वर्षती  भूवरी
फुले तो मोरपिसारा. २

येता पर्जन्याची धारा
होतो उन्मेश सोहळा
कोंब फुटून येईल
तोच लहान उमाळा. ३

येता वासरू हंबरे
गाय,प्रीत वासराची
करी स्पर्श एकमेका
रीत असे ही पान्ह्याची. ४

प्रित फुलपाखराची 
जडे हो फुलावरती
भिरभिर भिरभिर
फिरे ते फुला भोवती. ५

सांगे आभाळ मातीस
गंध तुझ्या गं प्रीतीचा
चढे लाल लाली अंगी
तेज:पुंज तो सूर्याचा. ६

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे३३✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!