आजचा उपक्रम कवयित्री गुरुनाथ सामंत यांची शब्द ओळ *काव्यप्रकार -अभंग*

काव्य व साहित्य मंच भंडारा आयोजित सोमवार दिनांक२९/१२/२०२५.

आजचा उपक्रम कवयित्री गुरुनाथ सामंत यांची शब्द ओळ 
*काव्यप्रकार -अभंग*

डोळे आहेत म्हणून 
कळे जगी मर्म ध्यान. १

डोळे पाहता लक्षात
येई काहीही मनात.? २

डोळे प्रत्यक्ष पुरावा
नको कसला दुरावा. ३

चाळीशीत मंद दृष्टी 
कमी हो दिसते  सृष्टी. ४

देवा मला सारे दिले
उपकार तुझे भले. ५

डोळे आणि कान असे
चार बोट म्हण खासे. ६

डोळे असून आंधळा
म्हणे तो असे बावळा. ७

डोळे करावेत दान
ठेवा अंधाचे ही भान. ८

 सु-रेखा सांगे नयन
करूयात सदा दान. ९

प्रा- सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!