विषय:- साहित्यातील योगदान*काव्यप्रकार- छोटा अभंग

*सामाजिक कार्य*
*विषय:- साहित्यातील योगदान*
काव्यप्रकार- छोटा अभंग

साहित्यात योगदान
असे प्रगल्भता भान. १

दिसामध्ये रोज लिहा
हर्ष जीवनात पहा. २

दुःख पेलण्याचे बळ
भाळी हर्षउल्सा माळ. ३

कथा कविता पोवाडा
भरे आनंदाचा घडा. ४

साहित्यात योगदान
देई जगण्याचे भान. ५

ज्ञानेश्वरी अनमोल
जगण्यास बहुमोल.६

साहित्याचे योगदान
मम् जीवा वरदान. ७

रामायणानेच येई
छान जगण्या आकर. ८

नमू माता शारदेला
आशीर्वाद सुरेखाला.९

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता