विषय :- आभाळ निळे (हायकू काव्यप्रकार)*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- २७.१२.२०२५ (शनिवार)*
*उपक्रम क्रमांक :- ११२३ (निसर्ग काव्य)*
*विषय :- आभाळ निळे (हायकू काव्यप्रकार)*

आभाळ निळे
जाते सांगून रीत
जीवन गीत. १

खग निघाले
निळ्या निळ्या आकाशी
जग प्रकाशी.२

मावळतीला
शोभा ती गगनाची
चंदा मामाची.३

आकाशाकडे
पहा सर्वत्र निळे
 स्वच्छंदी तळे. ४

मंद तो वारा
जाई स्पर्शू अंगास
शांती  मनास. ५

दूर पसरे
निळे आभाळ छान 
निसर्ग वान. ६

शांत चांदण्या
रात्री चमके तारे
धुंद ते वारे. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता