उपक्रम..चित्रकाव्यविषय..साने गुरुजी

काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम..चित्रकाव्य

विषय..साने गुरुजी 

   आज चौविस तारीख
अंकशास्त्रातील उतम
    अंक,संस्काराने सांगे
आदर्श जपण्याचे मर्म. १

     श्यामची आई पुस्तक
अजरामर साहित्यकृती
    तुरुंगी असताना लिहून
 ठेवल्या आईच्या  स्मृती. २

    आई सांगे त्यांना श्याम
पायाला घाण लागू नये 
    म्हणून जपतो तसे मना 
जप हो , घाण लागू नये. ३

    आदर्श शिक्षक लेखकाने
कवीने कथाकार स्वातंत्र्य 
   सेनानी  राष्ट्रप्रेमी गुरुजींनी
उठवूसारे रान गीताचा मंत्र. ४

     कुठे हरवे आजचा शाम
कुठे गेली श्यामची आई
    खरा तो एकची धर्म जगा
प्रेमार्पावे का दिसत नाही. ५

    आज त्यांची जन्म जयंती
या शुभप्रसंगी करू स्मरण
   पुन्हाएकदा शाम श्यामच्या 
आईचे व्हावे समाजात भरण. ६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता