काव्य बहर साहित्य मंच भंडाराचित्रकाव्य

काव्य बहर साहित्य मंच भंडारा
चित्रकाव्य
खिन्न चेहरा उदास नजर
आजी घरातून निघतेखरी
शोध घेत जाते नातवाचा
तिच्या व्यथाकथा पाहू तरी. १

आजी सत्तरीच्या  पुढची
कष्टमय जीवन जगलेली
स्वतःच्या पोटाला मारून
मुलांशी एकरूप झालेली. २

दिसे अंगकाठी उंची पुरी
हिरवेगार लुगडे काटपदरी
हातामध्ये घेऊनिया पिशवी
अनेक समस्या मनी उधरी.३

घरी सगळं ठीक असेल ना रे
कुंकवाचा धनी बराअसेल का
सदा काळजी तिला संवादाची
सुना मुलं नातू बोलतील का? ४

लेकीकडून येताना विचार येई
आई गेले वडील गेले माहेराला    
 पोरकी झाली ती,लेकीन तिला 
मान माहेरपणा सारखा दिला.५

आईचं माहेर पण करूया ही
 गरज काळाची  वेळेची आहे
हे सारं ओळखून हल्ली मुलीं 
आईचं माहेर पण करत आहे. ६

प्रा. सुरेखा कटारिया✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता