आजचे कवी. *डॉ.श्रीकृष्ण राऊत* शब्द ओळ. *श्वासांच्या हळव्या लयीत*

क्रम. शब्द ओळ कवीची 
             भावना आपल्या मनीची 

आजचे कवी.  *डॉ.श्रीकृष्ण राऊत*
    शब्द ओळ.  *श्वासांच्या हळव्या लयीत*

श्वासांच्या हळव्या लयीत
अंतरी कुपीत घेती झुला
श्वासाच्या वर्तमानात नवे
नवनवीन स्वप्न देही मला. १

श्वासाच्या हळव्या लयीत
जगण्याचाच संघर्ष खुला
समस्यांनीच जखडलेल्या 
जीवनी पडे प्रश्न श्वासाला. २

जगण्याचे सुंदर इंद्रधनु
खुणवती सदा श्वासाला
मोह माया क्रोधलोभने
वेडावले माझ्या मनाला. ३

मानवाचे ते जरतरी वस्त्र
श्वासांच्या हळव्या लयीत
सुखदुःखाने विणलेले हे
हे धागे नाआपणा माहीत. ४

जन्ममरणाच्या या खोल 
दरीत,समभावाने जगण्या
सांगून गेले की  साधु संत
मानवा घाले बांध वागण्या. ५

प्रा सुरेखा कटारिया✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता