विषय :-प्राजक्ताचा सडा* *(कव्यांजली काव्यप्रकार)*

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा.*
*दिनांक :- १३.१२.२०२५ (शनिवार)*
*उपक्रम क्रमांक :- ११०९ (निसर्ग काव्य)*
*विषय :-प्राजक्ताचा सडा*
          *(कव्यांजली काव्यप्रकार)*

प्राजक्ताचा सडा
हवाहवासा गंध चैतन्याचा
स्वप्नगुलाबी टिपण्याचा
प्रभातवेळी. १

वेलकलश कलंडले
जिकडेतिकडे प्राजक्त उधळले
वाऱ्यासवे बहरले
मांडवाखाली. २

चिऊचिऊ चिऊचिऊ 
किलबिल किलबिल पाखरांची
उधळण आनंदाची 
नाचणारी. ३

थेंब धरतीवर
छमछम छमछमत आले
गंध उमजले
कस्तुरीत.४

मैफिल  फुलांची
रातराणीचे फुलने स्मरावे
निसर्गास वरावे
जनजागृती. ५

चांदरातीला बोलायला
प्राजक्त भान हरपायला
माझ्या सोबतीला
मंतरणारा. ६
प्रा सुरेखा कटारिया✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता