उपक्रम. *❤️प्रेम काव्य ❤️*विषय:-- *वचन दिले तू मला*

*💐 काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शुक्रवार दिनांक १२-१२-२०२५ चा दैनिक उपक्रम क्रमांक ११०८💐*
   उपक्रम.  *❤️प्रेम काव्य ❤️*
विषय:--  *वचन दिले तू मला*
 लग्नाच्या बोहल्यावर
    वचन दिलेस तू मला
बांधूनी  वचनामध्ये
    जवळ केले मी तुला.१

सुखदुःखाच्या क्षणी
    साथ देऊन एकमेका
सावरू दोघांच्या मना
    घेतल्या की आणाभाका.२

मी दिव्य वात तू ज्योत
    मी सरिता तू किनारा
वाहते  जीवनधारा
    देऊ एकमेका सहारा.३

हसतो तेव्हा मनास
      टाकतोस मोहरून 
होता नजरा नजर
      तना टाकतो बहरून. ४

अनेक सुंदर मुली
    नको त्या रूपा भाळू
दिले वचन तू मला 
   भलतीकडे नको वळू. ५

 डोळ्याने खानाखुणा
    डोळ्यांची भाषा अबोल
 मी समर्पित तुझसी
     हे माझे अंतरीचे बोल.६

प्रा सुरेखा कटारिया✒️

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!