मधुसिंधू काव्यप्रकार)* (अर्थ :- वातावरण पाहून वागावे)

*काव्यबहर साहित्य मंच, भंडारा*
*दिनांक :- ११.११.२०२५ (गुरुवार)*
*उपक्रम क्रमांक :- ११०७ (म्हणी विशेष)*
*विषय :- वारा पाहून पाठ फिरवावी*
            *(मधुसिंधू काव्यप्रकार)*
            (अर्थ :- वातावरण पाहून वागावे)

वारा पाहून 
पाठ फिरवावी
जाम जिरवावी 
धीट होऊन.१

पोरी बाळांनी
रहावे सतर्क
नकोच वितर्क
जनाच्या मनी. २

वसंत गेला
झाले आता फिके
घुंगरूच मुके
येई जन्माला. ३

हर्षाने सारे
जगत रहावे
आनंदी असावे
जगी हो सारे. ४

जखम भरे
वेदना संपते
असवे पुसते
महंत सारे. ५

मुली शिकल्या
अनमोल ठेवा
जपायला हवा
साऱ्यांच्या भल्या. ६

प्रा सुरेखा कटारिया✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता