विषय---चित्रकाव्य शीर्षक-- संस्कार विद्येचा

काव्य बहर साहित्य मंच, भंडारा. 
बुधवारचा उपक्रम 
विषय---चित्रकाव्य 

शीर्षक-- संस्कार विद्येचा


शांत कांत शाळेमध्ये आहे
घडे मुलांचं उज्वल भविष्य
संस्कार संस्कृतीचेच जतन 
होत आहे सुंदरतेच आयुष्य.१

संस्काराचे सदा रुजवे बीज
जीवनाचे धडे  तीच शिकवते
सर्वांची प्रथम गुरु असे आई
मुलांसाठी सदा झिज झिजते. २

आजचा पालक बने मालक
नको  मालक हवा तो पालक
विद्यार्थीदशेच्या गाडीस हकत
हसतखेळत चालवतो चालक.३

पुस्तक वही हातात घेत मुले
वाचनात होताना दिसतो दंग
भरारी घेताना हो आकाशात
आपले दाखवतात विविध रंग.४

पुस्तक अभ्यास घडवी मस्त
आजी बटव्यात संस्काराची   
 शिकवण, मुलांच्या प्रगतीस
वाचन संस्कृती ती महत्त्वाची. ५

प्रा सुरेखा कटारिया✒️

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण