कवी: ना.घ. देशपांडे यांची शब्दओळविषय : - रानारानात गेली बाई शिळ

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
आयोजित सोमवारचा उपक्रम
   *शब्दओळ कवींची*
कवी: ना.घ. देशपांडे यांची शब्दओळ
विषय : - रानारानात गेली बाई शिळ

रानारानात जाता बाई शिळ
पक्षांच्या किलबिलतेची वेळ.१

मैना म्हणे जाते फिरतीवरती? 
सदाच  तुझ्या शिळेची उपरती.२

शिळ घाले पिल्लासी  पक्षिनी
येई संकट चाहूल त्या रक्षिणी.३

धावणाऱ्या सैराट मम्  मनाला
शीळ निरखते विराट  जगाला.४

रानावनी शीळेचाआवाज घुमतो
जाई जुई मोगरा चाफा बहरतो.५

मेघगर्जुनी घालीती शीळ वरून
लांडोराचे थुई थुई  सुंदर नर्तन.६

शीळ पोपटाची बोलतो  गोड
खातो डाळिंबदाणे पेरू फोड.७

कोकीळ कुहू कुहू  घाले शीळ 
मंजुळ स्वरांनी पाडे मना भुरळ.८

प्रा. सुरेखा कटारिया ✒️

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता