म्हण:-- *शहाण्याला शब्दांचा मार*
गुरुवार दिनांक ३०-१०-२०२५ चा दैनिक उपक्रम क्रमांक १०६६
उपक्रम. *मराठी म्हणी नुसार काव्य लेखन-सप्तक्षरी*
म्हण:-- *शहाण्याला शब्दांचा मार*
शहाण्यास शब्दांचा
केला हो भडीमार
जगी जीवन सुखी
जगण्याचा तो सार. १
शेण स्वतः खायचं
दुसऱ्याचं ते तोंड
सदा हो हुगायचं
यास ना तडजोड.२
अघळपघळ तो
घालू नये गोंधळ
नीट नेटकेपणा
दिसे व्यक्ती सोज्वळ. ३
अति शहाणा म्हणे
अगं अगं ये म्हशी
मला कुठे गं नेशी
हवं जे, ते स्व पाशी. ४
लेकी बोलता सुने
लागे,बोलण्यानेच
घडे समजदारी
कळे हे शब्दानेच. ५
माझे तेच की खरे
असे नाही म्हणावे
खरे तेच की माझे
असे सदा स्मरावे. ६
नसे पुरा वेड्यास
भार तो शब्दांचाच
पुरे शहाण्यालाच
मार तो शब्दांचाच.७
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे