विषय:- बदललं आहे गावशीर्षक:- गावाची कुस

ArLiEnKA अध्यात्म पुणे प्रतिष्ठान आयोजित 
उपक्रम क्रमांक:-१४१
दि.२१/११/२५
विषय:- बदललं आहे गाव

शीर्षक:- गावाची कुस

बदलतात जगण्याच्या 
वर्तमानातील हो दिशा
गावाची कुस बदलली
जगण्याच्या नव्याअशा. १

     रूढी बदलल्या परंपरा       
     बदलल्या,निद्रिस्त गाव
     प्रगतीने जागृतच झाला
     गुंठापतींचा वाढला भाव.२

चूल गेली स्टो गेले भुशाची 
शेगडी सुद्धा नाही राहिली 
बटन टाकतातच सुखद ती
गॅस शेगडी पुढे सरसावली.३

    ट्रिंग ट्रिंग  ट्रिंग करणारा
    टेलिफोन केव्हाच गेला
    आकर्षक तो दूर भ्रमंती
    बाल वृद्धांच्या हातीआला.४

विहिर,हापसे गेले,घरोघरी 
नळाने पाणी दारी आले
विजेच्या प्रकाशात गाव 
सदासाठी चमकू लागले .५

      गावाने कुस  बदलली
      इमले गाड्या नी बंगले
      जुनं तेच खरं असे सोनं
      प्रगतीने दार ठोठावले.६

मुळं तोडून झाड वाढत 
नाही,गावइतिहास पुसून
नवाइतिहास लिहिला तो
ना जाईअन् कुस बदलून.७

   बदलणं निसर्गाचा नियम
   जुन्या आठवणींची करत
   साठवण, जगावे आनंदाने
   गावाचे झाले शहर म्हणत.८

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!