विषय__सप्तपदी**शीर्षक- कन्यादान नव्हे कन्या प्रधान*

स्पर्धेसाठी, 
अर्लियन के ए मराठी प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा,
दि.२१/११/२५

*विषय__सप्तपदी*

*शीर्षक- कन्यादान नव्हे कन्या प्रधान*

   मिळाला मानवाचा जन्म 
स्वैराचारा रोखण्या कुंपण,      
   अग्निसाक्षीने  सप्तपदीत
दोन्ही परिवारी मोद शिंपण. १

    दोन जीवांचे होण्या मिलन  
 कन्याप्रधान अग्नी साक्षीनं
    मुंडावळ्या बांधून सात फेरे 
हातावरच्या मेदीच्या नक्षीनं. २

   सासर माहेर जोडण्यासाठी
गळी मनी मंगळसूत्र घालून
   दूध साखरे सम  विरघळत
व्हावे गोड समर्पित बोलून. ३

   अहिंसा आहे जीवनतत्व
विश्वास दया क्षमा शांती 
   तेथे असे मानवाची वस्ती
घर येईल विकास क्रांती.४

     सप्तपदीची सात वचने
दोघे विश्वासानं पाळूयात
    राग द्वेष मद मत्सर सारे
अग्नी साक्षीने जाळूयात. ५

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता