चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-२४२.
[12/11, 8:08 am] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-२४२.
शब्द मागे शब्द मनाच्या कुपितून
लाटेतून लाट जन्मते समुद्रातून
विचारांचा आचार दिसे कवितेत
भक्त सारस्वतांना सांगे मनातून
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे
🛶 अशोक कोठारी.🛶
[15/11, 9:21 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-२५०
पृथ्वी सारी हिरवाईन सजली
शालू हिरवा ,सूर्य ऊन पिवळे
मनमोहक दृश्य आगळे वेगळे
जग निसर्गाच्या जादूस भाळले
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे
[16/11, 6:27 am] katariyasurekha: चला चारोळीच्या गावा
चारोळी क्रमांक-251
गुलाबी थंडी छान गारवा
संत झुळूक येता हो पहाटे
प्रेमाने खुलतो तो मारवा
चहुकडे त्याचा सुगंध दाटे
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे
[16/11, 7:25 am] katariyasurekha: चला चारोळीच्या गावा, चारोळी क्रमांक-252
भव्य मंडप झालरी शिवाय
कधीच खुलून दिसत नाही
माणूस मोठा झाला तरी माणुसकीविना शोभत नाही
प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे
[18/11, 9:18 pm] katariyasurekha: चला चारोळीच्या गावा
चारोळी क्रमांक - २५४
*विषय :- निसर्गोपचार*
ऋषी मुनी महत्त्व देतात
नेहमी निसर्ग उपचारास
शरीर स्वास्थ्यासाठी हा
उपचार असे हो खास
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे
[19/11, 7:05 am] katariyasurekha: चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-२५५
पुस्तक घेत हाती पुस्तकाच्या
जीर्ण पानाशी मी बोलू लागले
आयुष्याच्या उतरणीला माझा
भूतकाळ निवांत वाचत बसले
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे
[20/11, 7:07 am] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-२५६
पहाटेच्या थंड गारव्याचा
क्षण थंड सुख समृद्धीचा
योगा व्यायामाने करूया
आरोग्य वर्धक आनंदाचा
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे
[21/11, 12:20 am] katariyasurekha: *चला चारोळीच्या गावा* चारोळी क्रमांक-२५७
*विषय - गैरसमज*
बोलताना शब्दाने शब्द वाढे
केव्हा केव्हा होतो गैरसमज
भ्रम संभ्रम सदा दूर करावेत
एकमेकांना प्रेमाने द्या उमज
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे
[21/11, 12:30 am] katariyasurekha: चला चारोळी गावा चारोळी क्रमांक-२५८
विषय__गैरसमज
हलक्या कानाच्या मनात
लवकर होतात गैरसमज
संवाद सदा साधून दूर ते
करत रहा चुकीचे समज
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे
[22/11, 6:55 am] katariyasurekha: चला चारोळीच्या गावात चारोळी क्रमांक-२५९
शब्दातील गर्भितार्थ कळे हो
टोमणे टामणे देतात फार
सदा लेकी बोले सूनेस लागे
शहाण्यास बसे शब्दांचा मार
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे