विषयः- *एक डोके पाच मने*शीर्षकः- चंचलमन
🪷काव्यबहर साहित्य मंच,भंडारा🪷
उपक्रमासाठी स्वरचित रचना
२७ नोव्हेंबर २०२५ , उपक्रम क्र.१०९४
विषयः- *एक डोके पाच मने*
शीर्षकः- चंचलमन
काय म्हणे, पाच मने
माणसाचे एकच डोके
मन वर्तमान,भूत काळात
कधी भविष्यात घेते झोके. १
जनी मानसी चंचल मन
मन कशाकशाचं मिश्रण
सुख दुःख मोह माया
साऱ्या भावनांच संमिश्रण. २
मनामध्ये अनेक चालतात
ताणतणाव,त्याने प्रेमभरे
रोगास होतं हो आमंत्रण
जानावे मनाचे वैशिष्ट्ये न्यारे. ३
क्षणात हस्त क्षणात रुस्त
निमिशातच आनंदी होतं
असं आहे हो चंचल मन
संयमान स्थिर होतं जातं. ४
एक डोकं बुद्धिमत्तेचं
चालक मात्र मन आहे
अनंत भावभावनांचं
दर्पण आपलं मन पाहे. ५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे