विषय :- संविधान दिन*उपक्रम क्र. १०९३*

काव्यभर साहित्य मंच भंडारा
*बुधवारचा उपक्रम* 
विषय :- संविधान दिन
*उपक्रम क्र. १०९३*

स्वातंत्र्य ,समता ,बंधुता
लोकशाहीस महत्त्वाचा
संविधानात असे आधार
नारा कर्तव्यच्या सत्वाचा. १

नोव्हेंबर एकोणविसशे   
 एकोणपन्नास असे खास
धर्मनिरपेक्षतेची धरून
कास पारतंत्र्याचा ऱ्हास. २

प्रत्येकाचे जगण्याचे असे
संविधान  घराचे, मंदिराचे, 
समाजाचे ,परिवाराचे अन
लोकशाही  देशात सर्वांचे. ३

मोठ्या लोकशाही भारताला
बळकट बनवले संविधानाने
सार्वभौम गणराज्यस हक्क
दिले डॉक्टर बाबासाहेबांने. ४

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!