विषय :- झाडांशी बोलतांना, काव्यप्रकार-षडाक्षरी

*विषय :- झाडांशी बोलतांना*
  *उपक्रम क्र. १०८९ शनिवार दिनांक :-२२/११/२०२५*
 काव्यप्रकार-षडाक्षरी
झाडशी माडाशी 
   बोलताना सुंदर 
फळ फुलं दिसे
     मनी हर्षभर . १

सदा देत जातो
    नको घालू घाव
 प्राणवायू देतो
    सारं तुला ठावं.२

कर्ब द्वीप्राणीद
   घेत ,शुद्ध हवा 
देतो,का मजशी
  मारे माझ्या भावा.३

देतो मी सावली
      होतं समर्पित 
घर तुला देतो
   हर्ष मज होत. ४

असे उपकारी
     तरी मज मारी
असे का करतो? 
     तुझं तरु तारी.५

संवादित रहा
   सदा हो माझ्याशी
इथे भेटे तुम्हा
  चार धाम काशी. ६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता