विषय--- सहज एकदा जाता जाता
काव्य बहर साहित्य मंच, भंडारा.
शुक्रवारचा उपक्रम
प्रेमकाव्य
विषय--- सहज एकदा जाता जाता
सहज एकदा जाता जाता
पाठमोरा तू मला दिसला
आपली नजरा नजर होता
तुला शोधण्या डाव फसला.१
तुला शोधण्या जाते लोचन
तुला पाहण्या आतुरते मन
भिरभिर फिरते माझी नजर
तुला भेटण्या फिरे वनवण.२
आठवते रे मज जात येता
भेटला होतास तू मम जना
हर क्षणी भेटावे तुला कृष्णा
राधाची ही प्रेमकथा कान्हा.३
युगा युगाची ओळख आपुली
कितीतरी लांबरुंद आयुष्य हे
मुठीत दडलेल्या फुलपाखरा
उघडे तर ऊडे दडपे मरे हे.४
दोघांचा काळ प्रेम धुंदीचा
भेटीसाठी सदा तरसण्याचा
पहारा जनाच्या नजराचा
काळ धडधडत्या हृदयाचा.५
डोळ्याने तो करीता इशारा
निशिगंधाचा सुगंध दरवळला
रातराणी गंधयुक्त बहरली
तुझ्या मुखी मनमोर टिपला.६
जरी चंद्रकोर ही वसेमुखी
तरी गोकुळात राधा उपाशी
निश्चय असे तिचा भेटे कृष्णा
खाईन तर मी साखर तुपाशी.७
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे