विषयः- *जलापरी मन निर्मळ ज्याचे* कवी बा. भ. बोरकर यांची ओळशीर्षकः-जगण्याची रीत

काव्यबहर साहित्य मंच,भंडार
   १६ नोव्हेंबर २०२५ , उपक्रम क्र.१०८४
विषयः- *जलापरी मन निर्मळ ज्याचे* कवी बा. भ. बोरकर यांची ओळ
शीर्षकः-जगण्याची रीत

जलापरी मन निर्मळ
 ज्याचे,सह्याद्रीची छाती
हिमालयाच  काळीज
 ही जगण्याची असे रीती. १

पोटी आगीचा डोंब
   अन् तहानलेला जीव
प्रेम जिव्हाळा देऊन
     जाणे भक्तांना शिव.२

उभारले घरदार
   जपली सारी नाती
प्रेमळ छत्राखाली
   स्वर्गसुख बहरती.३

खा भाकरी कष्टाची
     मन निर्मळ शिकवे
ऋणातून सण नको
    कुवत पाहून वागावे.४

मनी शांती वसते
   डोळ्या वात्सल्य बरसे
निर्मळ मना भेटण्या
       परमेश्वर ही तरसे.५

जनाबाईच्या कामा
      धावूनी आला  हरी
श्रद्धाभक्तीचे समर्पण
     निर्मळ मनाच्या घरी. ६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!