विषय :- भरती ओहोटी* *उपक्रम क्र. १०८२**शनिवार दिनांक :-१५/११/२०२५*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित शनिवारचा उपक्रम *निसर्ग काव्य*
     
*विषय :- भरती ओहोटी*
  *उपक्रम क्र. १०८२*
*शनिवार दिनांक :-१५/११/२०२५*

लागता समुद्रा ओहोटी
     शंख शिंपले वाळूची
रेतीची जणू भरे ओटी
  किमया असे निसर्गाची.१

सागराला येता भरती
   फेसाळत लाटा धावती
जणू त्या लाटा पळत 
    खो खोचा खेळ खेळती.२

अथांग विशाल समुद्र
    मना सदा सुखावतो
सुखदुःखाच्या भरती 
   ओहोटीत ही स्थिरावतो.३

जीवनातील अमावस्या
   कुटुंब संस्था उद्ध्वस्त
जीवनातील पौर्णिमा
   सुसंवादे जगा हो मस्त.४

यमुना गंगा सरस्वती 
      नावा तिलांजली दिली
सरितेचे  हे समर्पण
    प्रशांते सामावून घेतली.५

तो सागर ती  सरिता
    तो ती बाह्य भाग झाला
नदीचे सागरा मिलन 
     सरितेचा सागर झाला.६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता