विषय.. बालक दीन..?

काव्यबहर साहित्य मंच  भंडारा आयोजित विशेष उपक्रम..
आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने "बालकदिन" या विषयावर काव्यलेखन 
उपक्रम क्रमांक १०८१
दि.१४.११.२०२५
विषय.. बालक दीन..? 

 चाचा नेहरू जन्मदिवस
बालकाच्या नावे साजरा
    सदा निरागस मुलांसाठी
    दिवस असे हाच गोजिरा.१

बालक सद्यस्थिती निराळी
कामास जाणारेआई-बाप
     दुर्लक्षित झालेले बालक
    भविष्यात सर्वांनाच ताप.२

पूर्वी टक केलं की पोरं
अंगणी बोरा सम पडत
     भ्रमंतीवर मुले हो गुंगली
      जातोय एकलकोंडा वाढत.३

नजर सदा पडद्यावर स्थिर
रिमोटच्या मदतीने करे खून
    अडथळ्याच्या शर्यतीतून 
    जाणाऱ्या गाडीची ती धून.३

अशाच वेळी आले पाहुणे
बालकांना नकोसेच होतात
    किती माणूस घाणा झालाय? 
    आई बाबा मुलांना म्हणतात.४

वस्तू झाल्या मुलांच्या मित्र
भविष्य सारे दिसते विचित्र
    वर्तमानातलं हे सार सचित्र
    हे सांगे मुलांचं मानसशास्त्र.५

कुंडीतलं सावलीत वाढणार
रोप म्हणजे आजचा बालक
    क्षमताचा शोध घ्यायला हवा
    मालक न होता बना पालक.६

आजी आजोबा हेच चालत 
बोलत संस्काराच विद्यापीठ   
   पाळणाघर वृद्धाश्रम दूर करू
   सारे राहूया आपण एकजूट.७

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!