शीर्षक:- दमछाक*सदा ठेवावा या जीवनी

*आजचा उपक्रम*
*सामाजिक काव्य*
*आव्हान पेलतांना*

*शीर्षक:- दमछाक*

सदा ठेवावा या जीवनी 
विश्वास स्वतःच स्वतःवर
लौकिक प्रगती करताना
सदाभर द्यावा विज्ञानावर.१
 
   आव्हानांना पेलताना होते
   नेहमी दमछाक, संस्कारान
   प्रगट होत जातं संवादाच्या
  उर्मीचच लय बद्ध विरेचन .२

नव्या जगाची जीवनशैली
माणुसकीच ना उरते ठाई
माणूसपणा पायाभूत धर्म
हर्षाचं महत्व कळत नाही.३

     आव्हान पेलताना नेहमी 
     करा संस्काराचा आचार 
     मग सहजच सुटतात प्रश्न
     नाही येत मनात अविचार.४

वाटचाल जीवनी करताना
अडचणीत प्रश्नांचे स्वास्थ्य
संवादाचे ही निरोपसमारंभ
माणूस मिथ्या सोनं सत्य.५

      अनेक समस्या अनेक प्रश्न
       आपल्याच हाती अस्वस्थ         
       वर्तमानाचे भविष्य,जीवन
      सकारात्मकतेन जगा मस्त.६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!