अभंग रचना**शीर्षक:- ओढपांडुरंगा भेटी l पंढरीसी

*आजचा उपक्रम*
*शब्द कवीचे*
*कविवर्य कृ.ब.निकुंभ*
*काव्यपंक्ती: माऊलीच्या भेटीसाठी*

*अभंग रचना*

*शीर्षक:- ओढ

पांडुरंगा भेटी l पंढरीसी आलो l
भक्तीत रमलो l विठुराया.१
 
काम क्रोध मोह l बोलवती मजll
हाक देता तुज llयेई देवा.२

भक्तीत गुंतता lआनंद तो जाईll
जीव  शिवा होई l पांडुरंगा.३

एकाग्र  करितो l मनचित्त माझेll
सदा नाम तुझेl मुखी वसे.४

तन मन धन l असे तुझ्यासाठी ll
ओढ भेटीसाठी l भगवंता.५

ध्यानी मनी स्वप्नीlआस चिंतनाची
ओढ दर्शनाचीl  सदा असे.६

मुखे विठू नामl डोई वृंदावनll
निर्मळ ते मन l  माझे राहो.७

सुरेखाची ओढl माऊलीच्या भेटीll
व्हव्या गाठीभेटीl  याच जन्मी.८

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!