रावण दहनाच्या अगोदर रावणाची अंतिम इच्छा...!!*
*जय जय राम कृष्ण हरि...!!*
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
*रावण दहनाच्या अगोदर रावणाची अंतिम इच्छा...!!*
✨✨✨✨✨✨✨
!! विचार पुष्प !!
.. विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी सर्व समाज एकवटलेला होता, सर्व कार्यकर्ते अतिशय आनंदात रावण दहनाची तयारी करत होते..
रावणाच्या पुतळा बनवलेला होता... सहज दहन करता येतील अशा सर्व वस्तू त्या पुतळ्यामध्ये भरल्या होत्या.. भागातील एका मोठ्या नेत्याच्या हाताने दहनाचा कार्यक्रम पार पाडायचा होता.. दहनाच्या अगोदर सहज वाटले मृत्यूच्या अगोदर रावणाची अंतिम इच्छा विचारावी... म्हणून रावणाला विचारले बोल तुझी अंतिम इच्छा काय आहे.?. पुरवली जाईल.!!...
रावण घाबरला नव्हता, आम्हाला वाटले होते, खिन्न असेल, परंतु कुठलाही खेद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.. अंतिम इच्छा विचारल्यावर तो ताठ मानेने म्हणाला..लोक हो.. मी थोडसं बोलू का?.. सर्वजण म्हणाले.. बोला!
रावण म्हणाला.. मी वाईट आहे कारण जगन्माता सीतेचे हरण माझ्याकडून घडले आहे... पण तुम्हाला माहिती आहे का? की प्रभू रामचंद्रांनी माझी बहीण शूर्पणखा हिची विटंबना केली होती.. तीचा अपराध फक्त लक्ष्मणाबरोबर लग्न करण्याची इच्छा.. हे काय योग्य नव्हते का?. नसेल लग्न करायचे लक्ष्मणा बरोबर तर नकार द्यायचा ना.. पण रामाने तीची विटंबना केली.. मला ते सहन झाले नाही, राक्षसी वृत्ती असल्यामुळे मी त्या बहिणीचा बदला घेण्यासाठी सीतेला पळवून नेण्याचा गुन्हा केला.. हे असे करायला नको होते पण माझ्या हातून हे घडले, तरीपण एक लक्षात ठेवा सीतेवर मी कधी जबरदस्ती केली नाही.. विनयभंग ही केला नाही, फक्त लग्न करण्याचा आग्रह करत होतो, सांगा माझ्याकडून काही चुकीचे घडले का?. आज तुमच्या देशात काय चालले आहे.. शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनी वर अत्याचार होतात, आज भारत देशातली परिस्थिती पाहता, देशातील सगळीकडची स्त्रीची विटंबना पाहता लाजेने खाली मान जात आहे. डॉक्टर स्त्रियांवर अन्याय, शिक्षिकेवर अन्याय, चार सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार हे तुम्ही सर्वजण सहन करता, फक्त एक चूक माझ्या हातून घडली तर मला दहन करत आहात.. समाजातल्या या राक्षसांचा संहार करण्याची इच्छा तुम्हाला का होत नाही? तुम्हाला हे लोक माझ्यापेक्षा चांगले वाटतात का?.. तसं असेल तर आपली मर्जी, ठीक आहे, करा माझे दहन... मी तयार आहे जाळून घ्यायला, पण माझी अंतिम इच्छा विचारली आहे म्हणून सांगतो मला अवश्य जाळा सगळ्यांना पाहू सुद्धा द्या.. पण माझी एकच इच्छा आहे ती मात्र नक्की पूर्ण करा.. *ज्याच्या हाताने मला जाळायचे आहे, तो रामासारखा पवित्र आहे का?* *हे पहा आणि त्यालाच पाठवा मी आनंदाने जळायला तयार आहे. करणार का माझी एवढी इच्छा पूर्ण?...*
असं बोलून रावणाने डोळे मिटले.. व शांत जळण्यासाठी तयार झाला.
*बाबांनो रावण दहनाचा सोहळा तर पूर्ण करूया पण... त्याबरोबरच आपणासही राम होता येते का? हे पाहूया. मगच या विजयादशमीच्या रावण दहन या उत्सवास खरा अर्थ प्राप्त होईल अन्यथा एक पूर्वापार परंपरा चालवणेच ठरेल. वाचा आणि hविचार करा..!!*
रामकृष्ण हरि..
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
जगताप महाराज वलांडी कर..