विषयः- *लाल बहाद्दुर शास्त्री*

🪷काव्यबहर साहित्य मंच,भंडारा🪷
       उपक्रमासठी स्वरचित रचना
०२ आॕक्टोबर २०२५ , उपक्रमा क्र.१०३८
विषयः- *लाल बहाद्दुर शास्त्री*
शीर्षकः- *मुर्ति लहान किर्ति महान*


क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक
लालबहादूर शास्त्री ठेवी भान
स्वतंत्र देशाचे दुजे पंतप्रधान
मूर्ती लहान पण कीर्ती महान.. 
१
अहिंसा सत्य सहिष्णुता हेच
असे तत्त्व ते गांधीजींचे खास
स्वातंत्र्यासाठी गोळीझेलणाऱ्या
 वंदन करू धाडसानं जगण्यास
२
एकाचा झाला आघाती मृत्यू
तर दुसऱ्यावर होई गोळीबार
काय म्हणाव रे जनविकृतीला
राष्ट्रहित जपताना असा मार.. 
३
मंत्र जय जवान जय किसान
गांधींच्या सत्याग्रचे वाही वारे
राजकर्त्यांनी ठेवावे हो स्मरण
राजनेत्यांन लक्षात ठेवावे सारे.. 
४
राष्ट्रपिता महात्मा गांधी उपाधी
लाल बहादूर शास्त्री आहे छान
दोघेही दिन दलितांचे ते कैवारी
काव्यबहरने स्मृतीचे ठेवले भान.. 
५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता