चित्र काव्य शीर्षक - स्वप्न अष्टाक्षरी
काव्य बहर साहित्य मंच, भंडारा
उपक्रम क्र. १०४४
दिनांक - ८/१०/२०२५
चित्र काव्य
शीर्षक - स्वप्न
अष्टाक्षरी
मायलेकी हसूनिया
पाहे एकमेकीकडे
दिसे डोळ्यात धमक
मन ते जाणण्याकडे.. १
इवल्याशा त्या नयनी
माय स्वप्न दाखवते
पूर्ण करण्यास बळ
तिच्या पंखात भरते.. २
हर्ष उल्लास जीवनी
घडे भविष्य पर्वणी
वर्तमान आजचे हो
घडवण्या गुंते जणी.. ३
गणवेश असे खाकी
आई राबे तीजसाठी
देऊनिया शिक्षणाचा
वसा ती घडणीसाठी.. ४
भाव संवेदनशील
चित्र ते बोलके छान
मनी हो भविष्यवाणी
राष्ट्र उभारणी भान.. ५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे