विषय -धनत्रयोदशी

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा*
            *आयोजित*
        *उपक्रम क्र. १०५४*
*शनिवार दिनांक :-१८/१०/२०२५*
विषय -धनत्रयोदशी

लखलखणाऱ्या दिव्यासह  
  गृहलक्ष्मी घालते हो रांगोळी 
अश्विन कृष्णाची ती द्वादशी
   भारतभर पर्व सुरू दिवाळी
१
धनत्रयोदशी दीपावलीच्या    
    पर्वाचा असे दुसरा दिवस
शरीरस्वास्थ्य धनलाभास  
  करू धन्वंतरी पूजनदिवस.. 
२
समुद्र मंथनातून वर आले
    शंख चक्र अमृताचे कलश
धन्वंतरीचे  करूया पूजन
  अशी सुंदर ती धनत्रयोदश
३
तिन्ही सांजेला लावतो दिवा
   इडापिडा सदा टळण्यासाठी
दक्षिण दिशेला यमास दिवा
   सुखसमाधान दीर्घायुष्यासाठी
४
धन्वंतरी म्हणजे अवतार असे
   विष्णु भगवान समृद्धीचाराजा
सदा हसमुख आरोग्य लाभाव
  साजरी करतात राजासह प्रजा. 
५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता