विषय--स्वभाव*
अर्लियन के ए पुणे
प्रतिष्ठान आयोजित
उपक्रम क्रमांक 112
दि.13/10/25
*विषय--स्वभाव*
स्वभावाला ही औषध नाही
म्हण वाटते हो ही अवास्तव
जगण्याचे रंग आगळे वेगळे
विसरून कसं चालेल वास्तव.१
नारंगी कोटात एकत्र राही
एका संत्र्यात अनेक फोडी
चव प्रत्येकी आगळीवेगळी
सहजीवनी एकमेकां जोडी.२
आई बापाची अपत्य एकाच
कुशीतून मुशीतून जन्मा येई
रंगवेगळे रूपवेगळे तरी ही
अनेकांत वादाचे शिक्षण देई.३
वयानुसार स्वभाव बदल होत
असतो,काळानुसार बदलत
राहतो,जीवनाचा सार असतो
जगण्याची ही असते अदालत. ४
जगताना गोड कडू तिखट
आंबट साऱ्या चवी चाखताना
संयम ठेवून जगी जगताना
आनंद घ्यावा द्यावा वागताना.५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे