शीर्षक : पैसा

ArLiEn KA अध्यात्म पुणे प्रतिष्ठान आयोजित उपक्रम 
उपक्रम क्रमांक : ११९
विषय : पैसा

शीर्षक : पैसा 


स्वार्थाच्या जगी
     असतील शिते
पैशाला पहाता
       जमतील भुते.. १

पैसा पुत्र कमवे
     मान घरामध्ये
सदा वाढवी रे
  स्वार्थी जगामध्ये..२

शून्यालाही देता
    येते हो किंमत
एक अंक लिहा
      वाढते हिमंत..३

पैसा म्हणजेच
     नसते सर्वस्व
जगण्यासाठी हो
    प्रेम करा मनस्व.. ४

पैशाचाच माज
     कधी करू नये
पैशासाठी प्रेमाची
        नाते तोडू नये.. ५

कितीही कमवा
      इथे  राहणार
पैशासाठी मग
     का बरं भांडणार.. ६

पैसा असे साधन
       नसतो तो देव
आरोग्य धन संपदा
       हीच खरी ठेव.. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता