विषयः- *प्रित तुझी लपवितांना*

🪷काव्यबहर साहित्य मंच,भंडारा🪷
    उपक्रमासाठी स्वरचित रचना
३१ आॕक्टोबर २०२५ , उपक्रम क्र.१०६७
विषयः- *प्रित तुझी लपवितांना*

प्रकारः-  नऊक्षरी

प्रित तुझी लपवतांना
   स्नेह मला दिसला होता
तुझ्या गोऱ्या मुखावरचा
     चंद्र मला दिसला होता.१

सदा गोड प्रेमाची अदा
       तुझे ते मोहक हसणे
नको त्या कारणावरून
      असे कसे तुझे रुसणे. २

रुसता मनी घालमेल
     होते मी निशब्द अधीर
मला होते खोल जखम
    तुझ्या लोचनानी दे धीर. ३

जरा जवळूनी जाताना
      तुझी नजर मज जाळे
तुझे जुलमीच नयन
      जादू भरे तुझे ते डोळे. ४

तुझे असणे सुगंधाचे
     भय नसे आता जगाचे
मना धुंद ते करणारे
        फुले मोगरे प्रीतीचे. ५

नको हा विरह आता
     तुझ्याविना नको राहणे 
जरी भिन्न जात आपली  
     प्रेमा साठी नको बहाणे. ६

तुझ्यासाठी मी सदा आहे 
         युग युगे सौभाग्यवती
प्रित तुझी दाखविताना
         मंगळसूत्र ते भोवती. ७

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!