विषय -- ध्वनी प्रदूषण

विषय -- ध्वनी प्रदूषण 

प्रदूषणाचा गहन प्रश्न
    पाण्याचे हवेचे ध्वनीचे
प्रकृतीन बहाल केलेल्या
    नैसर्गिक धन संपत्तीचे.१

सणसुद पूजा आर्च्या
   ध्वनि क्षेपणाशिवाय नाही
डीजेच्या  मोठ्या  ध्वनीनं
       लहान थोर बहिरे होई. २

गाड्यांचे वाजणारे भोंगे
      रस्त्यात प्रदूषण वाढवी
अनावश्यक गोष्टी टाळून
      मानवा या समस्या सोडवी.३

दिवाळी  नातवांनी केली
        फटाक्या विना साजरी
अनाथाना देत फराळाचे  
       दिवाळी  झाली गोजिरी. ४

वल वल करत बोलून
      मन कुणाच दुखवू नये
 आवाज वाढवत रक्तदाब    
       विनाकारणच चढवू नये. ५

चला मग ध्वनी प्रदूषण
      फटाक्या शिवाय दिवाळी
आनंदाने साजरी करूया
      आनंदाने निसर्गच्या भाळी.६

कान नाक डोळे जीव्हा त्वचा 
          सांभाळूयात पंच इंद्रिया
 प्रदूषण रहित सावरू जीवा
      एकें बेंद्रीय तेंद्री चौरेंद्रिया. ७

प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!