विषय..सुख म्हणजे नक्की काय असतं
काव्यबहर साहित्य मंच भंडारा आयोजित उपक्रम.. सामाजिक काव्य
विषय..सुख म्हणजे नक्की काय असतं
सुख हवय का सुख ?
सुख म्हणजे काय हो
ही सुखाची व्याख्या
व्यक्ती परत्वे बदलते हो. १
प्रेम घ्यावे प्रेम द्यावे
प्रेमाने सर्वांना जिंकावे
खरा तो एकची धर्म
सर्वांना सदा प्रेम अर्पावे.२
बंगला गाडी घोडा पैसा
आम्हा असे सुख हवे
शारीरिक स्वास्थ्य नसेल
तर वैभवात सुख नव्हे. ३
इतरांच्या सुखदुःखात
होऊन सदा सहभागी
दुःखा दुःख सुखात सुख
माने तो असे अहोभागी. ४
स्वतःसाठी जगतो तो
फक्त जगतो,इतरांसाठी
जगतो तो मरून उरतो
समाधाने जगा सर्वांसाठी . ५
म्हणूनच म्हणतात मरावे
परी कीर्ती रुपीच उरावे
मिळालेल्या मानव जन्माचे
सदोदीत सार्थक करावे. ६
साधुसंत नेहमी सांगतात
चौ-याशी लाख जीवयोनीतून
मिळाला हा मानव भव
पुण्यकर्म कर मानवयोनीतून
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे