ओर्लियन के अध्यात्म पुणे प्रतिष्ठान उपक्रम अनुभव
ओर्लियन के अध्यात्म पुणे प्रतिष्ठान उपक्रम नंबर 108
वियोग संयोग असे
खेळ हाच नियतीचा
म्हणतात योगायोग
अनुभव प्रचितीचा. १
अनुभव हाच गुरु
शिदोरी ती महत्त्वाची
सदा चित्ती शांती हवी
हीच परीक्षा सत्वाची. २
मोठ्याचे अनुकरण
यश गाठण्या साह्य
तुम्हा काय कळतंय?
म्हणत नका करू बाह्य. ३
सुखदुःखाचे अनुभव
ती शिदोरी महत्त्वाची
सासुबाईंचे अनुभव
मजा होते सुनबाईची. ४
अनुभव वाढवितो
सर्वांचा आत्मविश्वास
कारलं कडू खाताच
बसे मनी दृढविश्वास.५
प्रा सुरेखा कटारिया -चिंचवड पुणे