क्रमांक १०५६ *दिवाळी विशेष**विषय- चतुर्दशी*

*काव्य बहर साहित्य मंच भंडारा आयोजित 
सोमवार दिनांक २०-१०-२०२५  चा *दैनिक उपक्रम क्रमांक १०५६ *दिवाळी विशेष*
*विषय- चतुर्दशी*

अश्विन वैद्य चतुर्दश
      पहाटे शाही स्नान
अभ्यंग होतात मने
   ठेवत मांगल्य भाण. १

आठवतात रामकृष्ण
       सत्कृत्य सदविचार 
 राक्षसाच्या प्रवृत्तीला
         सदा करी लाचार.२

अंधश्रद्धा अन् रुढ
       परंपराना टाकून
सर्वजण येई एकत्र
     वादविवाद सोडून. ३

स्त्रियांची कृष्ण करे
          दास्यातूनच मुक्ती
दिवाळी हर्षोल्हासाची
        सद्विचारांची शक्ती.४

 आकाशी तेवतो कंदील
       तुळशी वृंदावनी दिवा
धन्वंतरी जपत असे
        सर्वांच्या मना व जीवा.५

नको लवंगी नको 
     फटाके, सर्वांचे प्राण
वाचूया पर्यावरण
     ठेवूया निसर्गाचे भान. ६

प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता