शीर्षक:-आली दिवाळी काव्यप्रकार अष्टाक्षरी१९/१०/२०२५
विषय:-दीपावली
शीर्षक:-आली दिवाळी
काव्यप्रकार अष्टाक्षरी
१९/१०/२०२५
दिवाळीचा मोठा सण
आनंदाचा येतो क्षण
राजा सणांचा दिवाळी
भरे आनंदाने मन.. १
घर दार मन स्वच्छ
करूयात षडरपु
विकारांना सोडूयात
नाते स्नेहबंध जपु.. २
लागे दिव्याने दिव्याला
झगमगे असमंत
गाडू अज्ञान अंधारा
दिवाळीचा हा प्रबंध.. ३
याच दिनी भगवान
महावीर निर्वाणीची,
स्वामी गौतमास होई
प्राप्ती केवल ज्ञानाची.. ४
वरा सदा गृहलक्ष्मी
आई मुलगी बहीण
सौख्य भरे नांदू द्या
ठेवा समृद्धीची जाण.. ५
प्रा सुरेखा कटारिया-चिंचवड पुणे