भगवान महावीराने अंतिम निर्वाण समयी दिलेला बहुमोल उपदेश. "उत्तराध्ययन सूत्र"*

[19/10, 1:49 am] katariyasurekha: *भगवान महावीराने अंतिम निर्वाण समयी दिलेला बहुमोल उपदेश. "उत्तराध्ययन सूत्र"*
जैन परंपरेच्या मान्यतेवर आधारित प्रस्तुत आगम ग्रंथामध्ये अंतिम उपदेशाचे संकलन झालेले आहे .काही आचार्याच्या असे मानण्यात आले आहे की भगवान महावीराने आपल्या निर्वाणापूर्वी 55 अध्यायाच्या दुःख विपाकाचे वर्णन केलेले आहे. आणि 55 अध्यायनावरच सुख विपाकावर त्यांनी आपले मत निर्दिष्ट केलेले आहे .त्यानंतर त्यांनी स्वतः या अध्ययना पश्चात उत्तर अध्ययन अर्थात उत्तराध्ययनाचे 36 अध्ययन आपल्या अंतिम समयी घेतलेल्या समक्ष सभेत संपूर्ण प्राणी मात्रा समवेत पावापुरी येथे वर्णन केलेले आहे अपुष्ट अर्थात अखंड कधीच खंड न होणारे किंवा केव्हाच न फुटणारे वागणार म्हणजे आचरणाचे पालन करण्यासाठी अखंड असा उपदेश (देशना )सांगितली  गेलेली आहे .असेही सांगितले जाते की, 36 अध्याय पूर्णत्वाला नेल्यानंतर मेरुदेवी माता च्या नावाने प्रधानता देऊन ३७व्याअध्यायाचे वर्णन चालू केले. हे वर्णन करत असता अंतिममूहुर्ताला सुचिर्भूत होऊन ते कार्य करण्यास सिद्ध बुद्ध झाले .अर्थात मोक्षगामी मुक्त झाले .मात्र काही आचार्याने भगवंताच्या या अंतिम उपदेशाला मान्यता दिली नाही .प्रस्तुत आगमातील वर्णन पाहता असे वाटते की, तत्त्वज्ञानी आचार्यांनी नंतर याचे संग्रह संकलन केले असावे .काही अध्ययनामध्ये प्रत्येक विशिष्ट बाब अर्थात बुद्ध ही अन्य काही विशिष्ट श्रमण साधू द्वारा दिला गेलेला उपदेश अर्थात संवाद वाद विवादाचा हा संग्रह आहे. आचार्य भद्रबाहूने ही या गोष्टीला स्वीकृती दिलेली आहे. यामधील काही अध्याय अंगसाहित्यातून घेण्यात आले आहेत .काही जीन भाषेत इंद्रियावर विजेते जैन भाषेतून आहेत आणि काही विशिष्ट मुद्दे बुद्ध हे असणे श्रमनाच्या साधूचे उपदेश पर संवादावर आधारित ते वाटतात 
जे काही ?असेल मात्र त्याला स्वीकृती ही द्यावीच लागेल हे प्रस्तुत आगम  भावना ,भाषा ,व त्याच शैलीला महत्त्वपूर्ण आहेत यामध्ये सरळ आणि सहज पद्यकाव्यातून जे दाखवले गेले ते इतर गद्य वाङ्मयातही धर्म ,दर्शन, अध्यात्म, योग, आणि ध्यान याचे सुंदर विवेचन आढळलेही नसते प्रस्तुत आगम मध्ये 36 अध्ययन आहेत. यालाच उत्तर अध्ययन उत्तराध्ययण संबोधले जाते. दैनंदिन जीवनातून आत्म्याला मुक्ती देण्याचे साधन या उत्तराध्ययन सूत्राच्या माध्यमातून सहज सरळ आणि सोपी वाटणारे मनाला रुचणारे तत्त्वज्ञान जे या उत्तराधेयन ग्रंथाच्या माध्यमातून भगवान महावीराने आपणासाठी सांगितलेले आहे याच्या अध्ययनातून आपले कल्याण साधून जीवाचे हितच होत आहे. जे आपल्या हिताला कल्याणला आत्मदृष्टीप्रमाणे आहे त्यात आत्म्याची ओळख आहे अशा या सूत्रावर विवेचन करताना आपण पाहतो भगवंत हे उपदेश करताना त्यातील सारांश हा सहज लक्षात येण्यासाठी शीर्षकावरूनच कळण्यासाठी त्या उपदेशाला शीर्षकाचे नाव देतात. जे खालील प्रमाणे आहेत १) *विनयश्रुत*  या पहिल्या अध्ययनात त्यांनी सांगितले या अध्यायातून विनयाने झुकणे शिकवले गेले आहे हे झुकणे केवळ स्वार्थासाठी ,लालसे पोटी, अंतरीक इच्छेने शरीराने झुकणे नाही, तर आत्म्याला ज्ञानातून विनयतेने मोक्ष मार्गाकडे झुकणे सांगितलेले आहे. ज्यावेळी विनायता अंगीकारली जाते त्याचवेळी शालिनतेतून नतमस्तक होण्याचे शिकले जाते. २) *परिषह विजय* या अध्ययनात त्यांनी उपदेश कष्टावर मात करून विजय मिळवण्यासंदर्भात दिला गेलेला आहे कष्ट हे स्वच्छेने  स्वीकारायला हवे ३) *चतुरंगीय* याच्या नावावरून हा चार अंगाचा अध्याय म्हणून चतुरंगीय या नावाने समजतो मोक्ष प्राप्तीसाठी लागणारे मोक्ष मार्ग आणि हे मोक्ष मार्ग कसे मिळतील व ते मिळवण्यासाठी कसे पात्र ठरतील याविषयी विचार मंथन केलेले आहे अध्ययनात इती पासून अंतापर्यंत मोक्षाचा मार्ग मिळवण्याची साधना यावर उपदेश केला  आहे ४) *असंस्कृत आयुष्य*   संस्कृत हा भाषा लिपी व्याकरणातील शब्द असला तरीही त्याचा वास्तविक अर्थ हा या अध्यायात संस्करण करणे हा आहे. जीव हा शाश्वत (नित्य )असा आहे मात्र ज्यामध्ये तो वावरतो ते जीवन (अनित्य) असे नश्वर आहे ५) *अकाम मरण*.  या अध्यायात मरणाचे महत्त्व आणि त्याचा मरणाशी असणारा संबंध दाखवला आहे.मृत्यू आणि मृत्यूच्या भयापासून मुक्ती मिळवण्याची साधना यामध्ये उपदेशात केलेली आहे  ६) *क्षुल्लक निर्ग्रंथ* आलेल्या आढी जी क्रांती निर्माण होते हिच्या विरहित असणारी वृत्ती हिला निरग्रंती म्हणून ओळखले जाते अज्ञान हेच दुःखाचे मूळ असते तेच वेदनेला कारणीभूत ठरते याचा या अध्ययनात ऊहापोह  केलेला आहे.  ७) *एलयं ऊरभ्रीय* द्यावयाचा उपदेश हा यलयं ,मेषना, शेळी मेंढी वरून दृष्टांत त्यांनी दिलेला आहे. मूल्यवानाची ओळख पटली तर वृत्ती नसावी त्यापासून दूर हटवण्याची हे मौल्यवान तत्व या अध्ययनात पटवून दिले आहे.८) *कपिल केवली* हा धर्म कथा नुयोग यातून राजा कपिलाच्या उदाहरणातून लाभातूनच लोभीपणाची हावरटपणाची वृत्तीही बळवली जाते चिंतेतून केले जाणारे चिंतन हेच आत्म्याला स्वगतीत जाण्यासाठी सद्बुद्धी देते व असे चिंतन स्वमुखी ठरते आणि अशा स्वमुखीतून झालेले चिंतन आत्मकथेच्या माध्यमातून मानवाला सद्गतीकडे परावर्तित करते प्रत्येक वळणावर जीवनाला परावर्तित करणारी ही कथा केवळ ज्ञान मिळेपर्यंत सांगितलेली आहे ९) *नमी राजर्षी*  अंतर आत्म्याला मार्ग दाखवण्यासाठी त्याला मुक्त करण्यासाठी मोक्षमार्गाकडे चालण्याची ही संयमातून संन्यस्त होण्याची क्रिया ही धर्म कथानुयोग उदाहरणा वर लाभतो ज्यावेळी हा एकांत त्याचवेळी शांततेच्या माध्यमातून होतो तो निवांत हे दाखवलेले आहे १०) *द्रुम पत्र* द्रव्यानुयोग यावर आधारित हा वास्तविक उदाहरणावर दिलेला दाखला आपल्या निदेशुद्ध आत्म्याचे पावित्र्य राखून त्याच्या सद्गतीच्या मार्गाविषयी दिलेले उद्बोधन जीवनात मिळालेला अमूल्य वेळ हा निरुत्साहातून आलेल्या प्रमादातून व्यर्थ घालवायचा नसतो हे सांगितले आहे ११) *बहुश्रुत*   बहु श्रुत पुज्य या तीन नावावरून अध्यायाला महत्त्व मिळते बहु- भरपूर, श्रुत- ज्ञानी ,पूज्य- वंदनीय म्हणून अध्ययनात ज्ञानाविषयी ज्ञानाच्या लक्षणातूनच आत्म्याची ओळख होत असते हे विशद केले १२) *हरिकेशीमुनी* धर्म कथानुयोग याच शैलीवर दिलेला हा संदेश यामध्ये जातीवर्णावर आधारित मानवाचा जन्म हा चांडाळकुळाचा नसतो तर तो एक पंच इंद्रियधारी मानव जन्मातील सिद्ध बुद्ध आचरणातील वर्तनाचा ठरतो. हे हरिकेशीबल मुनीवर संबंधित असून त्यांच्या आयुष्यात समोरील घटना पाहून झालेल्या परावर्तनातून आत्मकल्याण साधण्याच्या मार्गाकडे मिळणारा बोध दाखवला गेला आहे१३) *चित्त आणि संभूत ऋषी* आपल्या जीवनात उदीत झालेले कर्म ज्या कर्मावर प्रगाढतेने संस्कारातून निर्माण होणारी वृत्तीचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे. होणार कोण मी? त्या केलेल्या निदानातून होत असते आत्म्याचे महापतन मात्र अंतर हृदयातून केलेले आत्मचिंतन हेच घडवते जीवाला मुक्ती देण्याचे साधन  १४) *इशूकारीय*  केवळ कोणाच्या वचनातून धर्म जागृती होत नाही. तर त्या परिस्थितीला अनुसरून मनामध्ये येणारा आत्मचरित्र भाव हा प्रवजीत होण्यास कारणीभूत ठरतो एक दिवा जरी प्रज्वलित झाला तरी तो पेटवतो असंख्य दिव्याला हेच या धर्म कथांनु योगाच्या माध्यमातून पाहण्यास मिळते. १५) *सभिक्षुक* सम्यक ज्ञान असण्यासहित सत्संगाने सानिध्यात असणारा तो साधू अशा साधूला सभिक्षुक म्हणून ओळखले जाते जो सुखदुःखाला समान ठरवून सम्यक दर्शनातून आत्मदृष्टीने सद्गती मिळवणारा साधु ठरतो. १६) *ब्रह्मचर्य समाधी स्थान* ब्रह्म म्हणजे स्व अर्थात आत्मा ज्याला आपण परमात्मा स्वरूपात पाहतो आणि या आत्म्याला चरिया अर्थात चालत जाणे चालणे याचाच अर्थ आपल्या आत्म्याला अशा रीतीने चालवणे अशा रीतीने वागणे आणि त्याच्या आचरणाने त्या आत्म्याची शक्ती व्यर्थ न वाया जाणे हा अध्यात्मिक रित्या अर्थ आहे आपली आत्म्याची असणारी शक्ती ही आत्म्याशीच संलग्न असावी १७) *पापश्रमण* चतुर्वेद संघासमोर पापश्रमण साधू कडून होणाऱ्या पापा विषयी सांगितले आहे साधूने आत्म कल्याणासाठी पुण्याचा मार्ग स्वीकारावे मात्र पंचन्द्र्याच्या माध्यमातून देहातीत पापाचे अधिकारी न व्हावे १८) *संजयीय* दृष्टीच्या परिवर्तनातून क्रूर निष्ठुरावर होणारी दयेची ,कृपाळूपणाची, नजर त्यालाच परिवर्तन करून त्याच्या आयुष्याला कशाप्रकारे स्थिरावते हे यातून सांगितले आहे भीती हीच भीती घालवण्या कारणीभूत ठरते आणि याच भीतीच्या अभय दानाने निर्भयही म्हणता येते १९) *मृगापुत्र* ज्या ज्या प्रमाणात सुख सुविधा उपलब्ध होतात त्या त्या प्रमाणात जीव पारतंत्र्यात गुंतला जातो हेच येथे सांगितले आहे. घडले जरा संत दर्शन तरच उलगडते त्याच्या जीवनातील सलग्न व्रतवैकल्याचे त्याच्या आत्मजागृतीचे लक्षण २०) *महा निर्ग्रंथीय* (अनाथीमुनी) जो कर्तव्याने महान आहे आणि त्याच्या कर्तव्यातूनच त्याचे महानत्व उभारले जाते अशा या महा निर्ग्रंथाला पोहोचण्यासाठी कोणता राजमार्ग आहे? मी अश्रित असा अनाथ नव्हे तर सर्वापेक्षा सरस असा अनादीनाथ आहे.



(उर्वरित अध्ययनाचे वर्णन पुढील भागात)
[19/10, 1:49 am] katariyasurekha: *भगवान महावीराने अंतिम निर्वाण समयी दिलेला बहुमोल उपदेश "उत्तराध्ययण सूत्र"*.       २
२१) *समुद्रपाल* ज्याप्रमाणे कर्म घडले जाते त्या त्या प्रमाणात त्याचे फळ मिळून आपली भगवंताशी सलग्नता साधली जाते .असेच स्वतःच्या व देवाच्या ऐक्याविषयी तुकाराम महाराज सांगतात
 तरुवक्ष बिजापोटी |बीज तरुवर शेवटी ||
तैसे तुम्हा आम्हा जाले | एकी एक सामावले||
यावरून याचाच उगम होतो आपण केलेले चिंतन हे अंतकरणातून असेल तरच आपण परमेश्वराशी एकरूप होतो कर्म फळाचे चिंतन घडली जर अंतकरणातून तर मिळेल स्व फळाचे आत्मदर्शीनही त्यातून २२) *अरिष्ठ नेमी+ राजमती+ रथनेमी* मानवाने मोहाच्या आधीन न जाता त्या मोहावरच व्हावे विजेता या तत्त्वावर आधारित असा हा व्यक्तीच्या नावावर संबोधित हा धर्म कथांयोगी संदर्भित तत्त्वाधीन सारांश या अध्यायात दिसत आहे.२३) *केशी कुमार श्रमण* विविध प्रकारातून आत्मज्ञान समजून घेण्याचा या उत्तराध्ययन प्रकल्पातून केलेला आहे हे करत असताना अनेक राजा राणी स्त्रियांचे दृष्टांत आपण अवलोकन केले आहे मात्र हा अध्याय वेगळ्याच धरतीवर असून यातून संवाद महत्त्वाचा आहे हाच संवाद विभिन्न विचारातून दृष्टीला पडतो ती भिन्नता तिला साधणारी विचाराची लाभते ही समानता यात समन्वयातून होते त्या उद्देशाची पूर्तता २४) *अष्ट प्रवचन माता* सम्यक विचाराच्या भावनेतूनच आईचे सकारात्मक कार्य ,माता आपल्या मुलावर विविध प्रकारे उपकार, करून त्याचे पालन पोषण रक्षण करणे ,आपल्या मुलाच्या भवितव्याची काळजी त्याची  काळजी करणे हे चार गोष्टीला जागृत करणारी माता ची केवळ या अध्यात अंतर्भूत आहे म्हणूनच सम्यक विचारातून निघतो मार्ग हा प्रगतीचा अशुभ भावनेतून बळावतो विचार हा निवृत्तिचा हे या मातेच्या आचरणावरून कळून येते.२५) *यज्ञीय* पापाचा नाश ,राक्षसांचा विध्वंस, शत्रूचा संहार ,समस्याचे निवारण, व्याधीचा परिहार, व त्याचा निसार या सर्व सफलता मिळवण्यासाठी ब्राह्मण, पुऱोहीत, ऋषीमुनी कडून यज्ञ आवश्यक मानला जात असे. दीर्घ आयुष्य कशामुळे मिळते समृद्धी का लाभते अमरत्व कुठून मिळते हे सर्व यज्ञातून मिळते अशी ब्राह्मणांची भावना पूर्वीच्या काळी होती त्यासाठी जीवनाचे स्वरूप समजण्याची आवश्यकता आहे आणि हेच या अध्यायातून प्रतिपादित केलेले आहे जीवनाचे स्वरूप समजण्याविषयी केलेले मार्गदर्शन हे तेच सत्य आहे जे चतुर्णातील मानवाला उदबोधित करते मानव जन्माच्या आधारावर नाही मनुष्य कर्मातून मनुष चतुरवर्णावर समजला जातो २६) *सामाचारी* वेळेवर कार्य करून वेळेची कार्यप्रणाली समजून घ्यावी समय वेळेची निकड समजणे गरजेचे असते ही या अध्यायातून माणसाच्या जीवन प्रणाली विषयी समजून सांगितले आहे .जर वेळेला समजून नियोजनबद्ध कार्य करणे अगत्याची ठरते तेच सामाचारीचे लक्षण असते २७) *अविनीत द्रृष्ट खलूंकीय* अ हितकारी निमित्तापासून वाचण्यासाठी समाजात वावरत असताना आलेल्या अनुभवावरून हा अध्याय उफहासात्मक उपमा देऊन समजावलेला आहे .यामध्ये उदंड झालेल्या दृष्ट बैलाचे, उन्नत चेकाळलेल्या स्वरूपाचे उदाहरण दिलेले आहे, म्हणूनच खलू नावावरून हा खलूंकीय अध्याय समजला जातो संघ व्यवस्थापनाला अनुशासनाची आवश्यकता असते तसे पालन नाही झाले तर स्वतः त्या संघाला सोडावे लागते नसता हाकलले जाते हे या अध्यायातून सांगितले आहे.२८) *मोक्ष मार्ग गती* आत्ममार्ग हा आत्म आराधनेचा सारांश आहे मुख्य मार्ग गती जीवनसाध्य करण्याच्या केलेल्या पूर्ण साधनेची सार आहे. आत्म्यासाठीच नाही तर आत्म्याच्या पश्चातही अध्ययनातून आत्म्याला गती मिळते या अध्यायात ही धर्मकथा विशद केलेली असून तत्वानुधारक आत्मा प्रज्वलित करण्यासाठी पेटवणारी ज्योती आहे या अध्यायातून हे समजावून दिलेले आहे जीवनरुपीद्रव्य आत्म्यालाण ज्ञानरूपी गुणाने समजावले तर मोक्ष मिळवणे सुलभ होते .२९) *सम्यकत्व पराक्रम* हा अत्यंत मर्मकारी महत्त्वाचा असा सम्यकत्वाचे ज्ञान देऊन जीवनाचा कायापालट करणारा हा आत्मबोधक अध्याय हा ग्रंथाचे प्राण ठरतो जीवन ज्योत महत्त्वाचे स्थान या प्राणाला असते तर बाकीचे अवयव हे दुय्यम ठरतात याचप्रमाणे या ग्रंथरुपी जीवनात हा अध्याय प्राणाच्या स्वरूपात वाटतो इतर सर्व अवयव याच्या तुलनेत दुय्यम दिसतात हा अध्याय कोणतेही प्रमाण अथवा धर्म कथा नुसार विषयात न करता तो तत्त्वज्ञानातून समजावून सांगितलेला आहे निर्मळ गुणाची प्रगटता ज्ञान दर्शन श्रद्धेतून लाभली ही चारित्र्याला सम्यकता या अध्यायातील पराक्रमाची हीच आहे विशेषता असा सम्यकत्व पराक्रमाचा संदेश यातून दिला आहे ३०) *तपो मार्ग गती* तप एक दिव्य रसायन आहे. जे शरीर आणि आत्म्याच्या योग्य भावनेला मिटवून आत्म्याला आपल्या मूळ काळातील अज्ञानयुक्त मोहाच्या कारणाने आत्म्याला कर्माशी बंदिस्त झालेले असते. त्याला विरक्त केल्याशिवाय त्यापासून तुठल्या शिवाय मुक्ती मिळत नसते. तपही कर्म तोडण्याची एक अमोघ उपाय आहे. त्याचे सजीव चित्र या अध्यायातून पाहण्यास मिळते तपमार्गा गतीतून दिला जाणारा संदेश मोक्षापर्यंत पोहोचण्याचे जलद साधन ही तप असते ३१) *चरण विधी* चरण पाऊल हे अत्यंत महत्त्वाचे असते दैनंदिन व्यवहारातील हा वाक्प्रचार हात पसरणे यापेक्षा पाय पसरणे किती महत्त्वाचे ही व्यवहारातून जाणवते याचाच अर्थ मदतीला हात पसरण्यापेक्षा केलेल्या कर्तव्यातून पुरुषार्थाने आपला झालेला उत्कर्ष आणि त्यातून बसलेला धंद्यावर जम हे जेवढे महत्त्वाचे त्याप्रमाणे आपल्या योग्य त्या कर्मातून पुरुषार्थातून ज्यावेळी आपले पाऊल पुढे पडले जाते त्याचवेळी आपण ठरवलेल्या उद्दिष्टाची गाठही घेत असतो हेच या अध्यायातून सांगितले आहे.३२) *प्रमाद स्थान* जीव हा अनादी काळापासून अत्यंत दुःखात आहे. या दुःखाचे मूळ कारण हे प्रमादच आहे पाच इंद्रियाला मानसिकतेतून मनोविज्ञान विषयातून राग, भोग ,रुची, तथा अमोदय विषयातून द्वेष ,आरूची घृणा, अशा प्रकारचा प्रमाद अवतरला जातो काहीच कार्य न करणे हे आळसाचे प्रमाण आहे. तर विषयाचा भोग करणे विषयाला अशक्त करणे हा विषयाचा प्रमाद अर्थात उन्माद आहे यातूनच घडते ती पापाची वृत्ती ठरते. पापाची जर भीती निर्माण झाली तरच धर्माशी जोडली जाईल प्रीती हेच यातून समजते ३३) *कर्म प्रकृती* कर्म हेच अत्यंत महत्त्वाचे कर्तृत्व असते आणि याच कर्तत्वाला अर्जुन विसरला होता ममत्व विसरून करावयाचे कार्य हेच कर्म सूक्ष्मरित्या कर्माची भेद अंतर ओळखून कर्मभेदी बनावे प्रकृतीजन्य सत्व रज वत्तम हे गुण सर्व कर्म करत असतात ३४)  *लेषाध्ययण* निराकार असणारा आत्मा याचे स्वरूप हे कोणालाही न जाणणारे कुठलाही भाव देहावरून न दाखवणारा स्वरूपाचा आहे. ज्याप्रमाणे सृष्टीवर पडणाऱ्या पर्यावरणातून त्यातून मिळणाऱ्या हवामानातून फरक जाणून येतो हिवाळ्या हिरवा गार झालेला परिसर हा केवळ पावसामुळे झालेला दिसून येतो आणि थंड वातावरणात निर्माण झालेला गारवा पाहण्यात येतो तर उष्ण हवामानाच्या फरकाने उन्हाळा कठीण जाणवतो त्याचप्रमाणे जीवालाही अंतर्मनातून उमटणारा भाव हा ताबडतोब जाणवतो यालाच आपण लेशा म्हणतो कर्म बंधनातून उद्भवलेली रागादिभाव हीच ग्रंथी देशाची भाव ठरू शकते ३५)  *अणगार गती* अगर म्हणजे घर, सदन, इमारत आपल्या निवाऱ्याची निवासस्थान, आणि अन म्हणजे नाही याचाच अर्थ आपण आपल्या घरापासून विरक्त होणे घर नाही समजून चालणे कारण हे घरंच माणसाला संसारात अडकवून ठेवते संसाराची बद्ध जीवावर राग द्वेषाचे परिणाम होत असतात त्यातून कर्मबंधन निर्माण होते कर्म बंधनामुळे जीव चार गतीने प्राप्त होतो जन्मतो जन्मातून त्याला शरीर लागते शरीरामुळे इंद्रिय प्राप्त होतात इंद्रियाच्या मदतीने जीव विषयाची सेवन करतो त्यातून पुन्हा राग द्वेष उत्पन्न होतात अशा तऱ्हेने जीव संसार चक्रात परिभ्रमण करीत राहतो म्हणून सहाय्यकारी सर्व सोबतीचा अर्थात संघाचा परित्याग करून मोक्षाला प्राप्त होण्याची साधना हीच अणगार मार्गाची व्यवस्था होय  ३६) *जीव अजीव विभक्ती* ज्याप्रमाणे भगवद्गीतेतील 18 वा अध्याय हा उपसंहार अर्थात संपूर्ण दिलेल्या ज्ञानातील विश्लेषणाचा सार सारांश ठरतो. असाच हा 36 वा अध्याय अंतिम समयी भगवान महावीराने प्रधान तत्व ज्ञानावर दिलेल्या ज्ञानार्जनाचा हा अंतिम अध्याय ठरतो वेगवेगळे विषयावरील तत्त्वज्ञानाला त्याच्या नावाला सार्थ राहतील अशा अध्ययनातून दिलेल्या 35 सारांश रुपी अध्ययनाचा या अध्यायात निकष लागतो .कारण जीवाच्या आत्ममुक्ततेला हा जीव अवतरत असतो. आणि तो जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी धडपडतो .त्यासाठी त्याला वारंवार अनेक योनीतून जन्माला येऊन आपल्या जीवनाला मुक्ततेसाठी उद्धार करावयाचा असतो. अशा मुक्ततेच्या अंतिम मार्गाला या अध्ययनातून जीव आणि 
अजीव याविषयी भगवंताने त्याचे विभक्ती आणि जीवाचे मोक्षाच्या प्रति समर्पण दाखवले आहे जीव अजीव विभक्तीचा संदेश भेद विज्ञान निर्वानाचे रहस्य देहापासून वेगळ्या अशा आत्म्याचा स्वीकार करणारा अंतरात्मा असतो.
  --------------संपत कोटेचा

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!